23 C
Latur
Friday, August 12, 2022
Homeआंतरराष्ट्रीयएलियन्सने फुग्यांमध्ये कोरोना विषाणू भरून पृथ्वीवर फेकला : किम जोंग

एलियन्सने फुग्यांमध्ये कोरोना विषाणू भरून पृथ्वीवर फेकला : किम जोंग

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाने आधीच धुमाकूळ घातला आहे. कोरोना व्हायरस कसा आणि कुठून आला याबाबत आतापर्यंत ठोस पुरावा मिळालेला नाही. मात्र कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीविषयी उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी अजब दावा केला आहे. त्यांच्या दाव्याची चर्चा जगभरात होत आहे.

किम जोंग उन यांनी म्हटले की, जगात कोरोना व्हायरस परग्रहावरील एलियन्सने पृथ्वीवर पसरवला आहे. उत्तर कोरियातील पहिला रुग्ण देखील एलियन्समुळेच सापडला. किम जोंग यांनी दावा केला की, दक्षिण कोरियाच्या सीमेवरून एलियन्सने फुग्यांमध्ये कोरोनाचे विषाणू भरून आमच्याकडे फेकले. त्यानंतरच देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला.

दरम्यान उत्तर कोरियात याआधीच एक अफवा पसरली आहे. ज्यानुसार एप्रिलमध्ये एका १८ वर्षीय सैनिक आणि पाच वर्षाच्या मुलाने एलियन्स सदृश््य व्यक्तीला स्पर्श केला होता. त्यानंतर दोघांमध्ये कोरोनाचे लक्षण आढळले आणि उत्तर कोरियात कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली. दक्षिण कोरियाने एलियन्सचा दावा फेटाळला.

उत्तर कोरियाचा शेजारी देश दक्षिण कोरियाने एलियन्सने कोरोना पसरविल्याचा दावा फेटाळला. वस्तूंच्या माध्यमातून कोरोना विषाणू पसरण्याची शक्यता फार कमी असते. त्यामुळे किम जोंग याच्या दाव्यावर विश्वास ठेवणे कठिण आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या