22.3 C
Latur
Wednesday, August 17, 2022
Homeआंतरराष्ट्रीयपाक माजी गृहमंत्र्यांनी बलात्कार केल्याचा अमेरिकन लेखिकेचा आरोप

पाक माजी गृहमंत्र्यांनी बलात्कार केल्याचा अमेरिकन लेखिकेचा आरोप

- पीपीपी नेत्यांच्या धमक्या; राजकीय वर्तुळात खळबळ

एकमत ऑनलाईन

इस्लामाबाद : अमेरिकन महिला सिंथिया डॅन रिची यांनी पाकिस्तानचे माजी गृहमंत्री रेहमान मलिक यांनी इस्लामाबादमधील राष्ट्राध्यक्ष भवन येथे बलात्कार केल्याचा दावा केला आहे. इतकेच नव्हे तर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान युसुफ रझा गिलानी आणि त्यांच्या पक्षाच्या काही नेत्यांनी मानसिक छळ केल्याचा आरोपही रिची यांनी केला. रिचीच्या या दाव्याने पाकिस्तानच्या राजकारणात वादळ निर्माण झाले आहे.

फेसबुक र्लाइव्ह दरम्यान रिची म्हणाल्या की, २०११ मध्ये रहमान यांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) सत्तेत होती. पीपीपीच्या इतर नेत्यांनीही त्यांचे शोषण केले. आता रिची यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. रिची म्हणाल्या की, त्यांच्याकडे याबाबत बरेच पुरावे आहेत आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा ती नक्कीच सादर करेल.

Read More  वल्लाह हबीबी…..! भारतात सुरू झालं कोरोना लसीचं उत्पादन

सिंथिया म्हणाल्या की, आपण २०११ मध्ये अमेरिकन दूतावासातील एका व्यक्तीला याबद्दल माहिती दिली होती. त्यावेळी कठीण परिस्थिती आणि अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण संबंधामुळे फारसा फायदा झाला नाही. आपण सध्या पाकिस्तानमधील एका शानदार व्यक्तीशी नात्यामध्ये आहे. त्यानेच आपल्याला बोलण्यासाठी प्रोत्साहित केले. यानंतरच आम्ही जोडीदार म्हणून पाऊल टाकू शकतो.

रिची यांनी फेसबुकवर सांगितले की, आपण बरीच वर्षे शांत राहिली. याचे कारण म्हणजे पीपीपी नेते आपल्याला धमकावत राहिले. यामुळे मला काही बोलता आले नाही. आता संपूर्ण जगाला या घटनेविषयी जाणून घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आपण हे सत्य सर्वांसमोर ठेवले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या