26.5 C
Latur
Sunday, January 17, 2021
Home आंतरराष्ट्रीय अमेरिकन्सना राष्ट्राध्यक्षावर भरवसा नाही; ट्रम्पवर अविश्वास

अमेरिकन्सना राष्ट्राध्यक्षावर भरवसा नाही; ट्रम्पवर अविश्वास

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : अमेरिकेतील नागरीकांना आणि राजकारण्यांना ट्रम्प यांच्या बाबतीत जास्तच भिती वाटू लागली आहे. विक्षिप्त स्वभावाचे ट्रम्प हे आपल्या अध्यक्षपदाच्या उर्वरीत १२-१३ दिवसात अणुयुद्ध पुकारण्याचा धोका त्यांना वाटू लागला आहे. अध्यक्ष या नात्याने त्यांनी असा जर आदेश दिला तर तो मानू नका अशी विनवणी करण्यासाठी अमेरिकन संसदेच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांनी लष्करी दलांचे सर्वोच्च प्रमुख जनरल मार्क मिल्ले यांना केली आहे.

अजून तरी ट्रम्प यांनी तसे काही संकेत दिले नसले तरी अमेरिकेतील कायद्यानुसार अण्विक युद्ध पुकारण्याचे सर्वाधिकार अमेरिकन अध्यक्षांकडेच असतात. त्यांना त्यासाठी अमेरिकेतील कोणत्याही अधिका-याची, काँग्रेसची किंवा मंत्रिमंडळाची मान्यता घेण्याची गरज नाही. त्यामुळेच ट्रम्प हा धोका पत्करण्याची शक्­यता अधिक आहे असे पेलोसी यांनी म्हटले आहे.

अमेरिकन लष्कराचे प्रवक्ते कर्नल डेव्ह बटलर यांनी नॅन्सी पेलोसी यांनी लष्कर प्रमुखांशी चर्चा केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. लष्कर प्रमुखांनी पेलोसी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्­नांना उत्तरे दिली,असे त्यांनी सांगितले असून ट्रम्प यांनी तसा आदेश दिला तर लष्कर तो मानणार काय या प्रश्­नावर मात्र कोणतेही भाष्य करता येणार नाही,असे त्यांनी म्हटले आहे.

लवकरच ड्रोनव्दारे होणार लस आणि पिझ्झा डिलिव्हरी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या