26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeआंतरराष्ट्रीयअमेरिकेची अर्थव्यवस्था गडगडली; आगामी काळात मंदीचे संकेत?

अमेरिकेची अर्थव्यवस्था गडगडली; आगामी काळात मंदीचे संकेत?

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असून दुस-या तिमाहीत (एप्रिल-जून २०२२) ही अर्थव्यवस्था गडगडली. तिच्यामध्ये ०.०९ टक्क्यांनी घट झाली आहे.

अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील ही सलग दुसरी घट आहे. ही अवस्था आगामी काळात मंदीचे संकेत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. युएस ब्युरो ऑफ इकॉनॉमिक अ‍ॅनालेसिसच्या (बीईए) माहितीनुसार, जानेवारी ते मार्च या पहिल्या तिमाहीत अमेरिकेच्या जीडीपीत १.६ टक्क्यांनी घट झाली होती. त्यानंतर पुन्हा एप्रिल ते जून या तिमाहीतही जीडीपीत घट झाल्याने ही तांत्रिक मंदीची नांदी असल्याचे सूचित होते.

रिअल जीडीपीत घट दिसून येणे याचा अर्थ खासगी संस्थांची गुंतवणूक, रेसिडेन्शिल फिक्स्ड इन्व्हेस्टमेंट, अमेरिकन सरकारचा महसूली खर्च, राज्ये आणि स्थानिक सरकारांचा महसुली खर्च तसेच नॉन रेसिडेन्शिअल फिक्स्ड इन्व्हेस्टमेंट यांच्यामध्ये काही प्रमाणात फटका बसला. त्याचबरोबर निर्यात आणि वैयक्तिक खर्चात वाढ झाल्याने जीडीपीत घट नोंदवली गेल्याचे बीईएने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी देशाची अर्थव्यवस्था मंदीकडे वाटचाल करत नसल्याचे म्हटले होते. माझ्या दृष्टीने रोजगाराचा दर अद्यापही इतिहासातील सर्वाधिक कमी पातळीवर आहे. त्याचबरोबर लोकांच्या गुंतवणूकीकडेही आमचे लक्ष आहे. अर्थव्यवस्था पुन्हा स्थिर होईल, अशी आशा व्यक्त करताना मला वाटत नाही की, आम्ही मंदीकडे वाटचाल करत आहोत, असेही बायडन यांनी म्हटले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या