वॉशिंग्टन: अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर तातडीने महाभियोग चालवण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांनी मोहीम चालवली आहे. आता त्याला रिपब्लिकन सदस्यांकडूनही हवा दिली जात असल्याचे दिसून येत आहे. रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर पॅट टूमी यांनी कॅपिटॉल हिल परिसरातील हिंसाचार प्रकरणी ट्रम्प यांच्या विरोधात भुमिका घेतली असून महाभियोग चालवण्यासारखेच ट्रम्प यांचे वक्तव्य होते, असे मतप्रदर्शित केले आहे.
पॅट टूमी पेनसिल्व्हेनिया प्रांताचे सिनेटर असून ते रिपब्लिकन पक्षाकडून निवडून आले आहेत. कॅपिटॉल हिल परिसरातील हिंसाचाराबद्दल त्यांना मत विचारण्यात आल्यानंतर त्यांनी ट्रम्प यांचे वक्तव्य आक्षेपार्ह असेच होते, असे सांगितले आहे. मात्र, महाभियोगाबाबत सिनेट सभागृहात नेमकी कोणती भूमिका मांडली जाईल, हे मला सांगता येणार नाही,असेही सांगितले. तसेच जर सभागृहात महाभियोगाचा प्रस्ताव आला, तर आपण ट्रम्प यांना हटवण्याच्या बाजूने मतदान करणार का, हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही.
तिस-या कसोटीवर ऑस्ट्रेलियाची पकड