28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeआंतरराष्ट्रीयचीनमधून आणखी एका महामारीचा धोका?

चीनमधून आणखी एका महामारीचा धोका?

एकमत ऑनलाईन

बीजिंग : जगात प्रथमच मानवामध्ये एच३एन८ बर्ड फ्लूचा संसर्ग आढळून आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या हेनान प्रांतात बर्ड फ्लूच्या एच३एन८ स्ट्रेनचा पहिल्या मानवी संसर्गाची नोंद झाली आहे. माध्यमांच्या अहवालानुसार, माहिती समोर आली आहे. त्याच वेळी, चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने जारी केलेल्या निवेदनात ही बाब घोषित करण्यात आली आहे. पण त्याचवेळी लोकांमध्ये त्याचा प्रसार होण्याचा धोका कमी असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे घाबरण्यासारखे काही नाही.

एच३एन८ बद्दल अधिक माहिती देताना चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने सांगितले की, एका चार वर्षांच्या मुलाला याचा त्रास झाला होता. एनएचसीनुसार, तापासह अनेक लक्षणे विकसित झाल्यानंतर मुलाला एच३एन८ विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले. त्यांच्या संपर्कात आलेली कोणतीही व्यक्ती या विषाणूच्या विळख्यात आली नाही, ही दिलासादायक बाब आहे. एनएचसीनुसार, मुलगा त्याच्या घरात पाळलेल्या कोंबड्या आणि कावळ्यांच्या संपर्कात आला होता.

त्यानंतर त्याच्यामध्ये तापासह अनेक लक्षणे दिसली आणि तपासणीत त्याला संसर्ग झाल्याचे आढळून आले. आरोग्य आयोगाने सांगितले की एच३एन८ प्रकार घोडे, कुत्रे आणि पक्ष्यांमध्ये जगात प्रथम आढळला आहे

. तथापि, एच३एन८चे कोणतेही मानवी प्रकरण नोंदवले गेले नाही. म्हणजेच ही जगातील पहिली मानवी केस आहे. या प्रकारात अद्याप मानवांना प्रभावीपणे संक्रमित करण्याची क्षमता नव्हती. अशा स्थितीत मोठ्या प्रमाणावर साथीचे आजार होण्याचा धोका कमी आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या