24 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeआंतरराष्ट्रीयइटलीकडून कोव्हिशील्डला मंजुरी

इटलीकडून कोव्हिशील्डला मंजुरी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : इटलीने एक मोठा निर्णय घेऊन कोरोनाविरोधी लस कोव्हिशिल्डला मंजुरी दिली आहे. इटलीतील भारतीय दूतावासाने ही माहिती दिली. इटलीच्या या हालचालीनंतर, कार्डधारक नागरिक आता युरोपियन देशांमध्ये प्रवासासाठीच्या ग्रीन पाससाठी पात्र होतील. आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आणि त्यांचे इटालियन समकक्ष रॉबर्टो स्पेरान्झा यांच्यात झालेल्या बैठकीच्या परिणामी इटलीने भारताच्या कोव्हिशील्ड लसीला मान्यता दिली आहे.

यापूर्वी बुधवारी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी इटलीचे परराष्ट्र मंत्री लुईगी डी मायो यांच्याशी देखील चर्चा केली. या दोन्ही नेत्यांमध्ये लसीचा प्रवेश आणि सुरळीत प्रवासाशी संबंधित आव्हानांवर चर्चा झाली. उल्लेखनीय म्हणजे, इटालियन परराष्ट्र मंत्री लुईगी डि मायो हे सध्या जी २० चे अध्यक्ष देखील आहेत. इटलीपूर्वी ब्रिटननेही भारताच्या कोविशील्डला मान्यता दिली होती. बुधवारी ब्रिटनने येथे येणा-या प्रवाशांसाठी कोविशील्डला मान्यता दिली. मात्र, भारतातून यूकेमध्ये येणा-या प्रवाशांना १० दिवस क्वारंटाईन राहणे आवश्यक आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या