25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeआंतरराष्ट्रीयमॉडर्ना लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी; डब्ल्यूएचओकडून मान्यता

मॉडर्ना लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी; डब्ल्यूएचओकडून मान्यता

एकमत ऑनलाईन

जिनेव्हा : जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. वेगाने पसरणा-या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणा-या कोरोनामुळे आतापर्यंत लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगभरात कोरोनावर संशोधन सुरू असून, रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असताना अनेक देशांमध्ये वेगाने लसीकरण देखील सुरू आहे. याच दरम्यान आता जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) मॉडर्नाच्या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली आहे. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मॉडर्ना लसीला ग्रीन सिग्नल मिळाला आहे.

अमेरिकेच्या या लस निर्मात्या कंपनीशिवाय जागतिक आरोग्य संघटनेने आतापर्यंत एस्ट्राजेनेका, फायझर-बायोनटेक, जॉन्सन अँड जॉन्सन लसींचा आपात्कालीन वापरास परवानगी दिली आहे. डब्ल्यूएचओने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत चीनच्या सिनोफार्मा आणि सिनोवाक लसींना देखील अशीच परवानगी दिली जाऊ शकते. मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन बॅन्सेल यांनी जागतिक आरोग्य संघटनेने कित्येक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी मॉडर्ना लसीच्या आपत्कालीन वापरास ग्रीन सिग्नल दिला आहे, असे म्हटले आहे.

सीबीएसई दहावी निकालाचे निकष जाहीर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या