23.2 C
Latur
Wednesday, June 16, 2021
Homeआंतरराष्ट्रीयकाश्मीरचे ३७० कलम काढणे हा भारताचा अंतर्गत मुद्दा

काश्मीरचे ३७० कलम काढणे हा भारताचा अंतर्गत मुद्दा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : ऑगस्ट २०१९मध्ये भारताच्या संसदेने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे हे कलम रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरची विभागणी लडाख आणि काश्मीर अशा दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये केली. त्यावरून पाकिस्तानने टीका करत तीव्र नापसंती दर्शवली होती. तसेच, काश्मीरच्या मुद्यांवर भारत सरकार योग्य भूमिका घेत नाही, तोपर्यंत भारतासोबत कोणतेही व्यापारी संबंध ठेवले जाणार नाहीत, अशी भूमिका नुकतीच शाह महमूद कुरेशी यांनी घेतली होती. मात्र, आता आपल्या या भूमिकेवर पाकिस्तान कायम नसल्याचे दिसत आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेश यांनी कलम ३७० रद्द करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयावर कायमच आगपाखड केली होती. मात्र, आता पहिल्यांदाच कलम ३७० ही भारताची अंतर्गत बाब असल्याचे पाकिस्तानने मान्य केले आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ही भूमिका मांडली आहे. मात्र, असे सांगताना त्यांनी कलम ३५अ आमच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे देखील नमूद केले आहे. भारतीय संसदेने कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. विरोधकांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात तीव्र शब्दांत टीका देखील केली होती. काश्मीरच्या मुद्यांवर भारत सरकार योग्य भूमिका घेत नाही, तोपर्यंत भारतासोबत कोणतेही व्यापारी संबंध ठेवले जाणार नाहीत, अशी भूमिका नुकतीच शाह महमूद कुरेशी यांनी घेतली होती.

आमच्यासाठी कलम ३७० महत्त्वाचे नाही
शाह महमूद कुरेशी यांनी या मुलाखतीमध्ये कलम ३७० आणि कलम ३५ अ या दोन्ही कलमांविषयी पाकिस्तानची भूमिका स्पष्ट केली. कलम ३७० माझ्यामते महत्त्वाचे नाही. ३५अ हे कलम पाकिस्तानसाठी महत्त्वाचे आहे. कारण या कलमाच्या माध्यमातून ते काश्मीरची भौगोलिक रचना बदलण्याचा प्रयत्न करू शकतात. जो ते आता करत आहेत. तो मुद्दा आमच्यासाठी महत्त्वाचा होता, आहे आणि राहणार आहे, असे ते म्हणाले आहेत.

नवीन स्ट्रेन भारतामधील रुग्णवाढीसाठी कारणीभूत; डब्ल्यूएचओकडून खुलासा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या