23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeआंतरराष्ट्रीयलेखक सलमान रश्दी यांच्यावर प्राणघातक हल्ला

लेखक सलमान रश्दी यांच्यावर प्राणघातक हल्ला

एकमत ऑनलाईन

न्यूयॉर्क : जगविख्यात लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये नुकताच हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांना चाकूने वार करून जखमी करण्यात आले आहे. लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्क येथे हल्ला झाला आहे. न्यूयॉर्कमधील बफेलोजवळील चौटौका येथे व्याख्यानापूर्वी स्टेजवर रश्दी यांच्यावर चाकूने वार करण्यात आले असून त्यात ते जखमी झाले आहे.

शुक्रवारी सकाळी व्याख्यान देण्यापूर्वी कार्यक्रमाच्या मंचावर असताना त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. मिडनाईट्स चिल्ड्रन हे सलमान रश्दी यांचे गाजलेलं पुस्तक आहे.

‘द सॅटेनिक व्हर्सेस’ या पुस्तकामुळे वादात
सलमान रश्दी हे एक जागतिक किर्तीचे लेखक असून बुकर पुरस्काराने त्यांना सन्मानित देखील करण्यात आलं आहे. दरम्यान त्यांनी लिहिलेल्या द सॅटेनिक व्हर्सेस या पुस्तकामुळे मोठ्या प्रमाणात वाद झाले होते. १९८० च्या दशकात सलमान यांच्यावर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमुळे वाद ओढावला होता. खासकरुन मुस्लिम समाजात त्यांच्या या पुस्तकामुळे वाद झाला होता. विशेष म्हणजे एका धार्मिक नेत्याने त्यांच्या हत्येचा फतवा देखील काढला होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या