24.7 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeआंतरराष्ट्रीयभारतीय अमेरिकन डॉक्टरांकडून ५ हजार ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरची मदत

भारतीय अमेरिकन डॉक्टरांकडून ५ हजार ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरची मदत

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतातील आरोग्य यंत्रणेची स्थिती पाहता अनेक देशांनी वैद्यकीय उपकरणांची मदत दिली आहे. आता भारतीय अमेरिकन डॉक्टरानीही मदतीचा हात पुढे केला आहे. फेडरेशन ऑफ इंडियन फिजिशियन असोशिएशनने (फिपा) ५ हजार ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. या मदतीमुळे कोरोना रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यास मदत होणार आहे.

भारताला मदत करण्यासाठी फिपाने ५ हजार ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरची खरेदी केली आहे. त्यापैकी ४५० युनिट अहमदाबाद, ३२५ युनिट दिल्ली आणि ३०० युनिट मुंबईला पोहोचले आहेत. हे सर्व युनिट रुग्णालये, आयसोलेशन सेंटर, मोबाईल रुग्णालय. सामाजिक संस्थांना देण्यात येणार आहेत, फिपाचे अध्यक्ष डॉ. राज भयानी यांनी ही माहिती दिली. जवळपास ३५०० युनिट भारतात लवकरच पोहोचतील असेही त्यांनी पुढे सांगितले. यासाठी भारतीय राजदूतांसोबत संवाद सुरु असल्याचे ते बोलले. नागरी उड्डयन मंत्रालय आणि एअर इंडिया हे युनिट लवकरच भारतात पोहोचवतील अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कोरोनाच्या दुस-या लाटेत मृत्यूचे अक्षरश: तांडव सुरु आहे. देशाच्या विविध भागात कोरोनाने हातपाय पसरले असून, रुग्णसंख्येचा तोल सांभाळताना आरोग्य व्यवस्था डगमगताना दिसत आहे. देशात दररोज हजारो रुग्णांचा मृत्यू होत असून, गेल्या २४ तासांतील आकडेवारी प्रत्येकाची झोप उडवणारी आहे. देशात अवघ्या २४ तासांत चार हजारांहून अधिक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही देशातील एका दिवसातील आतापर्यंतची उच्चांकी नोंद असून, २४ तासांत चार लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

इंटर्न डॉक्टरांचे आंदोलन: कोविड वॉर्डात रुजू होणार नसल्याचा पवित्रा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या