इस्लामाबाद : पाकिस्तानच्या हवाई दलाने गुरुवारी अफगाणिस्तानमधील तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या (टीटीपी) अड्ड्यांवर हवाई हल्ले केले. अफगाणिस्तानातील हश्त-ए-सुबाह या वृत्तपत्राने एका अहवालात हा खुलासा केला आहे.
टीटीपीचा गड मानल्या जाणा-या नांगरहार राज्यातील सलाला गुश्ता शहरात हे हवाई हल्ले करण्यात आले. या हवाई हल्ल्यात एका डेअरीत काम करणा-या चार नागरिकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.