ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन शहरात हिंदू मंदिरावर पुन्हा हल्ला करण्यात आला. स्थानिक वृत्तानुसार शनिवारी मंदिराची तोडफोड करण्यात आली आणि भिंतीवरील देवतांच्या फोटोंचे नुकसान केले.
ऑस्ट्रेलियातील मंदिरांवर दोन महिन्यांत हल्ल्याची ही चौथी घटना आहे. पूजेसाठी मंदिरात आलेल्या भाविकांच्या निदर्शनास ही घटना आली आणि त्यांनी मंदिर समितीला माहिती दिली. ब्रिस्बेनच्या दक्षिणेकडील बरबँक उपनगरातील श्री लक्ष्मी नारायण मंदिराची खलिस्तानी समर्थकांनी तोडफोड केली.