28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeआंतरराष्ट्रीययुक्रेनवर हल्ले सुरूच राहतील

युक्रेनवर हल्ले सुरूच राहतील

एकमत ऑनलाईन

मास्को : रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष सुरुच आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला सहा महिने उलटून गेले आहेत. एकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष या दोन्ही देशांतील संघर्ष संपण्याची वाट पाहत आहे. या दरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केलेले महत्त्वाचे वक्तव्य समोर आले आहे. पुतिन यांच्या या वक्तव्यावर युद्धाची पुढील परिस्थिती अवलंबून आहे. पुतिन यांनी म्हटले आहे की जोपर्यंत निश्चित लक्ष्य पूर्ण होत नाही तोपर्यंत रशियन सैन्याची युक्रेनमधील कारवाई सुरुच राहील.

पुतिन यांनी युद्धाच्या परिस्थितीवर प्रतिक्रिया देत सांगितले आहे की, जोपर्यंत आमचे लक्ष्य पूर्ण होत नाही तोपर्यंत रशियाचा युक्रेनवरील हल्ला सुरुच राहिल आहे. युक्रेनवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पश्चिमेकडील देशांनी रशियावर अनेक निर्बंध लावले आहेत. पुतिन यांनी या मुद्द्यावरून पश्चिमेकडील देशांवर निशाणा साधला आहे.

युक्रेनमध्ये सैन्य का पाठवले?
पुतिन म्हणाले की, युक्रेनमधील रशिया-समर्थित फुटीरतावादी भागांचे रक्षण करण्यासाठी युक्रेनमध्ये सैन्य पाठविण्यात आले होते. फुटीरतावाद्यांनी २०१४ मध्ये रशियाने क्राइमियाला जोडल्यानंतर संघर्षात युक्रेनियन सैन्यांशी लढा दिला. रशियाच्या प्रत्येक पाऊलाचा उद्देश डॉनबासमध्ये राहणा-या लोकांना मदत करणे हा आहे. हे आमचे कर्तव्य आहे आणि आम्ही हे ध्येय नक्कीच साध्य करू. पाश्चात्य देशांच्या निर्बंधांना तोंड देत रशियाने आपले सार्वभौमत्व मजबूत करत त्यांना प्रत्युत्तर दिले आहे असेही पुतिन यांनी पुढे सांगितले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या