25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeआंतरराष्ट्रीयचीनला ऑस्ट्रेलियाचा दणका

चीनला ऑस्ट्रेलियाचा दणका

एकमत ऑनलाईन

कॅनबेरा: गेल्या काही दिवसांत व्हिएतनाम, तैं.वानला धमक्या देणा-या चीनला ऑस्ट्रेलियाने चांगलाच दणका दिला आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी सुरक्षितेच्या मुद्यावर चीनसाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या बेल्ट अ‍ॅण्ड रोड इनिशिएटीव्हचे दोन करार रद्द केले आहे. करारानुसार चिनी कंपन्या ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया प्रांतात इमारती व पायाभूत सुविधा तयार करणार होत्या. हा करार व्हिक्टोरिया राज्याने चीनसोबत केला होता. आता प्रांतीय सरकारचा करार रद्द करण्याची भूमिका ऑस्ट्रेलियन सरकारने घेतली आहे.

चीनसोबत २०१८ आणि २०१९ मध्ये हा करार करण्यात आला. आम्ही नवीन राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार, चीनच्या या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टला रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र धोरणाशी हा करार योग्य नाही. आमचे परराष्ट्र संबंध सध्या प्रतिकूल आहे. चीनने ऑस्ट्रेलियासोबत तणाव वाढल्यानंतर सहकार्याचे संबंध बाधित करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियानेही चीनला धडा शिकवण्यासाठी हे मोठे पाऊल उचलल्याचा माहिती ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री मारिस पायने यांनी दिली.

उमरगा येथे हॉटेलच्या उधारीवरुन दगडाने ठेचून तरुणाचा खून

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या