19.8 C
Latur
Monday, December 5, 2022
Homeआंतरराष्ट्रीयमाऊंट मनास्लूवर हिमस्खलन; १० जण अडकले, दोघे ठार

माऊंट मनास्लूवर हिमस्खलन; १० जण अडकले, दोघे ठार

एकमत ऑनलाईन

काठमांडू : हिमालयाच्या पर्वत रांगामधील माऊंट मनास्लूवर हिमस्खल झाले असून यामध्ये दोन गिर्यारोहकांचा मृत्यू झाला. तसेच इतर १० जण अडकले आहेत, बेपत्ता लोकांच्या शोधासाठी बचाव मोहिम राबवण्यात येत आहे.
माऊंट मनास्लूवरील मोहिमेसाठी १२ गिर्यारोहकांचा एक गट गेला होता. या मोहिमेदरम्यान, हिमस्खलन झाल्याने हे सर्वजण त्यामध्ये अडकले आणि जखमी झाले. यांपैकी तीन जण गंभीर जखमी झाले होते. पण नंतर यातील दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये शेर्मा क्लाईंबर्स, सातोरी अ‍ॅडव्हेंचर, इमॅजिन नेपाल ट्रेक्स, इलाइट एक्स्पेडेशन आणि ८ के एक्स्पेडेशन या संघटनांच्या गिर्यारोहकांचा यामध्ये समावेश आहे.

या मोहिमेत चौथ्या कँपपूर्वीच ही दुर्घटना घडली. दरम्यान, या महिन्यातील २८ ते २९ सप्टेंबरपर्यंत ४०० गिर्यारोहक या मोहिमेत सहभागी होणार आहेत. पण तत्पूर्वीच अशी घटना घडल्याने सर्वांना धडकी भरली आहे. या मोहिमेतील इमॅजिन नेपाल ट्रेकर्सचा प्रतिनिधी दावा शेर्पा यांनी सांगितले की, यामध्ये पाच जण जखमी झाले आहेत. यांपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या