23.4 C
Latur
Sunday, August 9, 2020
Home आंतरराष्ट्रीय बांग्लादेश नाही विसरला ३० लाख हत्या व लाखो महिलांवरचे बलात्कार

बांग्लादेश नाही विसरला ३० लाख हत्या व लाखो महिलांवरचे बलात्कार

ढाका : पाकिस्तानने बांग्लादेशच्या ३० लाख लोकांची केलेली हत्या आणि महिलांवर केलेले बलात्कार बांग्लादेश अजूनही विसरला नसल्याचे बांग्लादेशचे विदेश मंत्री एके अब्दुल मेनन यांनी म्हटले आहे. पाकिस्तानने अजून पर्यंत या गोष्टीची माफी देखील मागितली नसल्याचे त्यांनी सांगितले.

पाकिस्तान चीनच्या सांगण्यावरून बांग्लादेश बरोबर दोस्ती करण्याचे प्रयत्न करत आहे. पाच दशकांपूर्वी झालेली घटना पाकिस्तान विसरले असेल पण बांग्लादेश अजूनही विसरला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

भारताच्या विरोधात एक अजेंडा बनवण्यासाठी चीनच्या सांगण्यावरून पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांनी २२ जुलैला बांग्लादेशच्या पंतप्रधान हसीना शेख यांच्याबरोबर फोनवरून चर्चा केली.

या चर्चेमध्ये कोरोना आणि दोन्ही देशांचे संबंध कसे चांगले होईल होतील यावरही चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. या चर्चेमध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी काश्मीरच्या मुद्द्यावर देखील शेख हसीना यांच्या बरोबर चर्चा केली.

अनेक राजकीय विश्लेषक या चर्चेमुळे बांग्लादेश नेमके काय पाऊल घेईल याची उत्सुकतेने वाट बघत आहेत. पाकिस्तान आणि बांग्लादेशमध्ये १९७१ च्या नरसंहारामुळे चांगले संबंध निर्माण होणार नाही असेही काही विश्लेषकांचे मत आहे.

Read More  मुलांना समजून घ्या, अपेक्षा लादू नका

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,140FansLike
93FollowersFollow