16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeआंतरराष्ट्रीयइस्रायलच्या पंतप्रधानपदी बेंजामिन नेत्यान्याहू यांचे कमबॅक

इस्रायलच्या पंतप्रधानपदी बेंजामिन नेत्यान्याहू यांचे कमबॅक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : बेंजामिन नेत्यान्याहू यांचे इस्रायलच्या पंतप्रधानपदी कमबॅक झाले आहे. इस्रायलच्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान यायर लॅपिड यांचा पराभव झाल्याने नेत्यानाहू यांची पुन्हा पंतप्रधानपदी वर्णी लागली आहे. एनबीसी न्यूजने याबाबत वृत्त दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेत्यानाहू हे चांगले मित्र आहेत.

इस्रायलच्या सार्वत्रिक निवडणुकीत बेंजामिन नेत्यानाहू यांचा विजय झाला आहे. यामध्ये विद्यमान पंतप्रधान यायर लापिड यांना पराभवाचा सामना करावा लागला. इस्रायलच्या निवडणुकीत सुमारे ९१ टक्के मतपत्रिकांची मोजणी झाली. यामध्ये १२० जागांपैकी ६५ जागांवर नेत्यानाहू यांच्या गटाने विजय मिळवला.

दरम्यान, नेत्यानाहू यांच्या लिकुड पक्षाला ३२ जागा, पंतप्रधान यायर लापिड यांच्या येश आतिद पक्षाला २४, रिलिडिय जियोनिज्म पक्षाला १४ तर नॅशनल युनिटी पक्षाला १२, शास पक्षाला ११ आणि युनायटेड टोरा जुदाइस्म पक्षाला आठ जागा मिळाल्या आहेत.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या