वॉशिंग्टन: अमेरिकेचे ४६ वे अध्यक्ष म्हणून जो बायडन यांनी पदभार स्विकारला आहे. सत्तातरांनंतर लगेच त्यांनी ट्रम्प यांच्या काही धोरणांना सातत्याने केलेला विरोध खरा ठरवत ट्रम्प यांचे तब्बल १७ निर्णय रद्द केले आहेत. बायडन यांनी पहिल्या दिवशी संध्याकाळी ओव्हल येथील राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयात हजेरी लावत १७ अध्यादेशांवर स्वाक्ष-या केल्या आहेत. यापैकी जवळजवळ सर्वच निर्णय हे ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळात घेतलेले निर्णय असून हे रद्द करण्यात आले आहेत.
बायडन यांनी वातावरण बदलाशी लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील पॅरिस हवामानबदलविषयक करारामध्ये अमेरिका पुन्हा सहभागी होणार असल्याची सर्वात महत्वपूर्ण घोषणा केली. यापुर्वी ट्रम्प यांनी या करारातून माघार घेतली होती. याशिवाय बायडन यांनी करोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी अध्यादेश जारी केला. सर्वसामान्यांना जास्तीत जास्त प्रमाणात आर्थिक मदत देण्यासंदर्भातील घोषणा केली. वर्णद्वेष संपवण्याचा निर्णयही घेतला. अमेरिका आणि मॅक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्याचा निर्णय रद्द केला. जागतिक आरोग्य संघटनेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. ट्रम्प प्रशासनाने मुस्लीम आणि आफ्रिकन देशांवर घातलेली बंदी हटवली. हे सर्व ट्रम्प यांचे महत्त्वाकांक्षी निर्णय होते. मात्र आता ते बदलले गेले आहेत.
सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग