37.8 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeआंतरराष्ट्रीयबायडेन पडले; पायाला दुखापत

बायडेन पडले; पायाला दुखापत

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या उजव्या पायाला हेअरलाइन फ्रॅक्चर झाले आहे. पुढचे काही आठवडे त्यांना विशेष बूट वापरावा लागू शकतो, असे त्यांच्या डॉक्टरने सांगितले. बायडेन आपल्या पाळीव कुत्र्यासोबत खेळत असताना, पाय घसरुन पडले, त्यांच्या उजव्या पायाच्या घोटयाला दुखापत झाली.

एक्सरे मध्ये कुठेही फ्रॅक्चर दिसले नव्हते. पण अजून काही तपासण्या केल्यानंतर फ्रॅक्चर असल्याचे स्पष्ट झाले, असे डॉ. केविन ओ कॉननॉर यांनी रविवारी सांगितले. सीटी स्कॅनमध्ये छोटेसे हेअरलाइन फ्रॅक्चर असल्याचे दिसले. त्यांना काही आठवडे वॉकिंग बूट वापरावा लागू शकतो, असे ओ कॉननॉर यांनी सांगितले. ते जीडब्ल्यू मेडिकल फॅकलटी असोसिएटसमध्ये संचालक आहेत. बायडेन यांच्याकडे दोन जर्मन शेपर्ड कुत्रे आहेत. त्यातल्या. मेजरसोबत खेळत असताना ७८ वर्षीय बायडेन यांचा पाय घसरुन पडले.

वाराणसीत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुतळ्याची विटंबणा

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या