27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeआंतरराष्ट्रीयबायडेन, हॅरिस पर्सन ऑफ द ईअर

बायडेन, हॅरिस पर्सन ऑफ द ईअर

एकमत ऑनलाईन

न्यूयॉर्क : टाईम मॅगझीनने अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उप-राष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांना वर्ष २०२० साठी पर्सन ऑफ द ईअर घोषित केले आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेत बहुप्रतिक्षित अशा राष्ट्राध्यक्षपदाचा निवडणूक पार पडल्या. निवडणुकांच्या निकालानंतर जो बायडेन आणि कमला हॅरिस यांचा विजय झाल्याचे घोषित करण्यात आले होते.

वृत्तसंस्था एएफपीच्या अहवालानुसार डेमोक्रेटिक पक्षाचे जो बायडेन आणि कमला हॅरिस यांना टाईम पर्सन ऑफ द ईअर म्हणून निवडले असल्याची माहिती दिली. जो बायडेन यांनी ट्रम्प यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. तर दुसरीकडे कमला हॅरिस यांच्या हातीदेखील उप-राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यात आली. गेल्या वर्षी पर्यावरणाच्या चळवळीत सहभागी असलेल्या ग्रेटा थनबर्गला पर्सन ऑफ द ईअरने सन्मानित करण्यात आले होते़ तर २०१६ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना हा सन्मान मिळाला होता.

काँग्रेसला संपविण्याचा कट; यूपीए अध्यक्षपदावरून संजय निरुपम यांची टीका

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या