24.9 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeआंतरराष्ट्रीयबायडेन, हॅरिस यांचा २० जानेवारीला शपथविधी

बायडेन, हॅरिस यांचा २० जानेवारीला शपथविधी

एकमत ऑनलाईन

वाशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूकची सध्या जगभरात चर्चात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत जो बायडेन विजयी ठरलेत. लवकरच बायडेन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्विकारतील. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी विजयी होण्यासाठी चांगलाच जोर लावला होता.

बायडेन यांच्या भाषणावेळी वादळी पाऊस झाला होता. मात्र या पावसातही बायडेन यांनी जोरदार भाषण केले. गर्दी जमून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी समर्थकांना कार घेऊन रॅलीला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. ज्यो बायडन यांची ही सभा त्यांच्या विजयासाठी महत्वाची ठरली अशी चर्चा आहे.

जो बायडेन यांच्या ऐतिहासिक विजयानंतर डेमोक्रॅटिक पार्टीने सत्तांतराची जोरदार तयारी सुरू केली आहे. अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचा २० जानेवारी २०२१ राजी शपथविधी सोहळा पार पडणार आहे. याबाबतची माहिती दोघांनीही आपल्या अधिकृत ट्विट अकाऊंटवरून दिली आहे.

शोपियांमध्ये दोन दहशतवादी ठार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या