वॉशिंग्टन : अमेरिकेत होत असलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे जगाचे लक्ष लागले आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन हे निवडणूक लढवत आहेत. दोघांमध्ये अध्यक्षीय निवडणुकीतील शेवटची चर्चा शुक्रवारी झाली. यावेळी ट्रम्प यांनी बोलताना भारतातील हवा घाणेरडी असल्याची टीका केली होती. त्यावरून जो बायडेन यांनी ट्रम्प यांना सुनावले आहे.
भारतातील हवा घाणेरडी असल्याचे सांगत ट्रम्प यांनी भारताच्या हवामान बदलांविषयीच्या कामावर शंका उपस्थित केल्या होत्या. या विधानावर जो बायडेन यांनी नाराजी व्यक्त केली. राष्ट्रपती ट्रम्प यांनी भारताला घाणेरडे म्हटले आहे. मित्रांविषयी कसे बोलायला हवे, हे पण माहिती नाही आणि जागतिक स्तरावरील हवामान बदलाच्या आव्हानांना कसे सोडवायला हवे. आपण आणि सहकारी कमला हॅरिस आम्ही दोघेही भारत अमेरिका यांच्यातील मैत्रीला महत्त्व देतो, असे बायडेन यांनी ट्विट करून म्हटले आहे.
काय म्हणाले होते डोनाल्ड ट्रम्प?
अमेरिकेत गेल्या ३५ वर्षात सर्वात कमी कार्बन उत्सर्जन होत आहे. आपली हवा स्वच्छ आहे. पाणी सर्वात स्वच्छ आहे आणि कार्बन उत्सर्जन सर्वात कमी आहे. चीनकडे पहा. किती घाणेरडी हवा आहे. रशियाकडे पहा किती घाण आहे. भारताकडे पहा किती घाणेरडी हवा आहे, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
कमी क्षेत्रात उसाचे अधिक उत्पन्न घेणे काळाची गरज