23.4 C
Latur
Thursday, March 23, 2023
Homeआंतरराष्ट्रीयबायडेन यांच्या युक्रेन दौ-यामुळे आगीत तेल

बायडेन यांच्या युक्रेन दौ-यामुळे आगीत तेल

एकमत ऑनलाईन

कीव्ह : रशिया-युक्रेन युद्धाला ४ दिवसांनंतर १ वर्ष पूर्ण होत असताना अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन सोमवारी अचानक कीव्हला पोहोचले. बायडेन यांनी या दौ-याद्वारे रशियाला कठोर संदेश दिला आहे. ते म्हणाले अमेरिका युक्रेनच्या पाठिशी आहे. हे झेलेन्स्कींना सांगण्यासाठी मी आज कीव्हला आलो आहे.

बायडेन यांच्या दौ-यावर आता संपूर्ण जगातून प्रतिक्रिया येत आहेत. चीनचे परराष्ट्र मंत्री किन गँग यांनीही यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले काही देश आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत. हे तत्काळ बंद झाले पाहिजे. यामुले हे युद्ध अधिक धोकादायक व नियंत्रणाबाहेर जात आहे. रशियाने अद्याप बायडेन यांच्या दौ-यावर अधिकृत भाष्य केले नाही. पण बायडेन यांच्या या कृतीमुळे तेथील लष्करी तज्ज्ञांमध्ये खळबळ माजली आहे. रशियाचे सुप्रसिद्ध पत्रकार सर्गेई मरदन यांनी टेलिग्राम चॅनलवर लिहिले की बायडेन यांचा युक्रेन दौरा रशियासाठी लज्जास्पद आहे. बहाद्दरीच्या गोष्टी केवळ मुलांसाठी सोडल्या पाहिजेत.

चिथावणीशिवाय काहीच येत नाही
दुसरीकडे, रशियाच्या फेडरल सेक्युरिटी सर्व्हिसचे माजी अधिकारी इगोर गिरकीन यांनी बायडेन यांचा उल्लेख दादाजी म्हणून केला आहे. ते म्हणाले की, युद्धाच्या मैदानात येऊन सुखरूप परत जाणे बायडेन यांच्यासाठी मोठी गोष्ट नव्हती. त्यांना चिथावण्याशिवाय दुसरे काहीच येत नाही.

पुतीन पूर्वीच बायडेन पोहचले
रशियाच्या लष्करी अधिका-यांकडून चालवण्यात येणा-या एका टेलीग्राम चॅनलवर एक अधिकारी म्हणाला की, पुतीन यांच्यापूर्वीच बायडेन कीव्हला पोहोचले. युद्धाला १ वर्ष होत आहे. आम्हाला कीव्हमध्ये अमेरिका नव्हे तर रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना पहायचे आहे.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या