25.5 C
Latur
Monday, September 27, 2021
Homeआंतरराष्ट्रीयदुबई विमानतळावर मोठा अपघात

दुबई विमानतळावर मोठा अपघात

एकमत ऑनलाईन

दुबई : जगातील सर्वात वर्दळीच्या विमानतळांपैकी एक असलेल्या दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज मोठा अपघात झाला आहे. या अपघातातमध्ये फ्लाय दुबई आणि बहरीनमधील गल्फ एअर या दोन विमान वाहतूक कंपन्यांची विमाने विमानतळावरील टॅक्सी वेवर एकमेकांवर आदळली. दरम्यान, या दुर्घटनेत कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नसल्याची माहिती अधिका-यांनी दिली आहे.

दुबईत विमानतळावर दोन विमानांची टक्कर होऊनही मोठा अपघात टळल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. कोरोनाच्या फैलावापूर्वी जगातील सर्वात व्यस्त विमानतळ असलेला दुबई विमानतळ या अपघातानंतर दोन तासांसाठी बंद ठेवावा लागला. मात्र त्यामुळे दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम झालेला नाही.

या अपघाताबाबत फ्लाय दुबईने दिलेल्या माहितीनुसार त्यांचे बोईंग ७३७-८००एस विमान किर्गिस्तानला जात होते. तेव्हाच हा अपघात झाला. या अपघातामुळे प्रवाशांना समस्यांचा सामान करावा लागला. सहा तासांनंतर दुस-या विमानाने या प्रवाशांना रवाना करण्यात आले. या अपघाताची चौकशी प्रशासनासोबतच फ्लाय दुबई तरणार आहे. दरम्यान, या अपघातात एअरक्राफ्टचा विंगटिप दुर्घटनाग्रस्त झाला, असेही विमान कंपनीने सांगितले.

डिजिटल इंडिया : ज्ञान हीच शक्ती!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या