वॉशिंग्टन: जगभरातील धनाढ्य व्यक्तींमधील मोठे नवा असलेले मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मालक बिल गेट्स यांनी अमेरिकेत मोठ्या प्रमाणात शेतीखरेदी केली आहे. गेट्स यांनी अमेरिकेतील विविध १८ राज्यात तब्बल २ लाख ४२ हजार एकर शेती खरेदी केली आहे. त्यामुळे अमेरिकेतील सर्वात मोठे शेतकरी बनले आहेत. गेट्स या जमिनीवर ते स्मार्ट सिटी बनविण्याचा विचार करीत आहेत. बिल यांनी शेतीच्या जमिनीव्यतिरिक्त अनेक जमिनी खरेदी करुन ठेवल्या आहेत,असेही सांगण्यात येत आहेत.
गेट्स यांनी एरिजोनामधील जमिनीवर स्मार्ट सिटी उभारण्याची योजना केली आहे. याशिवाय अर्कांन्ससमध्ये ४५ हजार एकर आणि एरिजोनामध्ये २५ हजार एकर शेतीची जमीन खरेदी केली आहे. वॉशिंग्टनमध्ये १६ हजार एकर जमीन खरेदी केली होती. त्यातील १४.५ हजार एकर जमीन हॉर्स हॅवेन हिल्समधील असून तिच्यासाठी गेट्स यांनी तब्बल १२५१कोटी रुपये मोजले आहेत.
गरीब देशातील भुकबळी कमी करणार ?
बिल गेट्स यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात जमीन खरेदीचे कारण सांगितलेले नाही. कास्केड इनव्हेस्टमेंट कंपनीनेदेखील बिल गेट्सद्वारा जमीन खरेदी बाबत अधिक माहिती दिली नाही. कंपनी सस्टेनबेल फॉर्मिंगसाठी बरीच मदत करीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. या जमिनीच्या माध्यमातुन गरीब देशांमधील भुकबळीची समस्या दूर करणार असल्याची चर्चा माध्यमात सुरु आहे.
लातूर शहरात घरगुती वापरासाठीही पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा होणार