24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeआंतरराष्ट्रीयभाजपकडून रॉकेल शिंपडण्याचे काम

भाजपकडून रॉकेल शिंपडण्याचे काम

एकमत ऑनलाईन

लंडन : देशात सध्या रॉकेल श्ािंपडण्याचे काम भाजप करत आहे. त्याची एक ठिणगी मोठी आग लावू शकते. ही आग विझविण्याची जबाबदारी काँग्रेसची आहे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी ब्रिटनमध्ये बोलताना म्हटले आहे. शुक्रवारी २० मे रोजी, त्यांनी लंडनमधील केंब्रिज विद्यापीठात ‘आयडियाज फॉर इंडिया’ परिषदेत भाग घेतला. त्यावेळी त्यांनी विविध आरोप करत भाजपवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींसह सीताराम येचुरी, सलमान खुर्शीद, तेजस्वी याद यांच्यासह अनेक विरोधी नेते या परिषदेत सहभागी झाले होते. राहुल गांधींनी यावेळी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, काँग्रेसला पूर्वीसारखा भारत मिळवायचा आहे, त्यासाठी ते लढत आहेत. त्याचवेळी भाजप त्यांचा आवाज दाबत आहे. ते म्हणाले की, ज्या संस्थांनी देशाची उभारणी केली, त्यांच्यावर देशाचे हल्ले होत आहेत.

भाजपसाठी भारत फक्त भुगोल
भाजप सरकार आणि आरएसएस देशाला भूगोल म्हणून पाहतात. पण आमच्यासाठी, आमच्या पक्षासाठी भारत हा माणसांचा बनलेला आहे. मात्र, पक्षात सध्या अंतर्गत कलह, बंडखोरी, निवडणुकीत पराभव होत असल्याचे राहुल यांनी नाकारले नाही. भारतातील परिस्थिती सध्या चांगली नाही यावर राहुल यांनी भर दिला. देशात रॉकेल श्ािंपडण्याचे काम भाजप करत आहे. एक ठिणगी आग लावू शकते. ही उष्णता शमविण्याची जबाबदारी काँग्रेसची आहे.

भारताची पाकिस्तानशी तुलना
यादरम्यान राहुल यांनी केंद्र सरकारवर सीबीआयसारख्या संस्थांचा गैरवापर केल्याचा आरोप करत भारताची तुलना पाकिस्तानशी केली आहे. आरएसएसवर टीका करताना राहुल म्हणाले की, आरएसएससाठी भारत सोन्याचा पक्षी आहे आणि कर्माच्या आधारे आपला वाटा वाटून घ्यायचा आहे, ज्यामध्ये दलितांना स्थान नाही. याशिवाय राहुल गांधींनी काँग्रेसच्या पराभवाचे श्रेय ध्रुवीकरण आणि मीडिया कंट्रोलला दिले. ते म्हणाले की आरएसएसने लोकांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. काँग्रेस आणि विरोधी पक्षांनीही असेच केले पाहिजे आणि त्या ६०-७०% लोकांना एकत्र केले पाहिजे, जे त्यांना मत देत नाहीत.

मोदींनी देशाचे रक्षण करावे
लडाख सीमेवरील पँगाँग त्सो सरोवरावर चीनी सेना दुसरा पूल बांधत असल्याच्या मुद्यावरून काँग्रेसने सरकारवर प्रहार केला आहे. देशाच्या सुरक्षेशी तडजोड नको, पंतप्रधानांनी देशाचे रक्षण करावे, असे आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधींनी केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी गुरुवारी स्पष्टीकरण दिले होते. त्यावर राहुल यांनी ट्विट करून मोदी सरकारवर हल्ला चढवला. डरपोक आणि मवाळ उत्तर उपयोगाचे नाही, असा टोलाही राहुल गांधींनी हाणला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या