23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeआंतरराष्ट्रीयपाकमध्ये ईशनिंदा कायदा बनला हिंदूविरोधी हत्यार

पाकमध्ये ईशनिंदा कायदा बनला हिंदूविरोधी हत्यार

एकमत ऑनलाईन

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये हिंदूंसह अल्पसंख्याकांवर अत्याचार, जबरदस्ती धर्मांतर आणि हत्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांवर अत्याचार करण्याचे सर्वात मोठे हत्यार म्हणून ईशनिंदा कायदा समोर आला आहे.

अलीकडेच, हैदराबादमध्ये ईशनिंदाशी संबंधित एका खोट्या प्रकरणात हिंदू समाजातील अशोक कुमार यांना केवळ हिंसक जमावाने लक्ष््य केले नाही तर पोलिसांनी अटकही केली आहे.

पाकिस्तान ुमन राइट्सनुसार, २०२१ मध्ये देशभरात ईशनिंदा केल्याच्या आरोपाखाली ५८५ लोकांना अटक करण्यात आली होती. त्याचवेळी धार्मिक कारणावरून अहमदिया समुदायावर १०० हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील तीन अल्पसंख्याकांची वेगवेगळ्या ठिकाणी हत्याही करण्यात आली आहे.

पाकिस्तानमध्ये कट्टरपंथी मुस्लिमांकडून हिंदूंसह अल्पसंख्याक कुटुंबांवर अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. विशेषत: गेल्या काही वर्षांत हिंदू तरुणींचे अपहरण करून त्यांचे मुस्लिम तरुणांसोबत विवाह करून त्यांचे कोर्टात धर्मांतर केल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या