कॅलिफोर्निया : अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील १३ शहरांमध्ये बर्फाच्या वादळामुळे आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. वादळात ९ जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश आले आहे. कॅलिफोर्नियामध्ये बर्फवृष्टीमुळे ७० हजारांहून अधिक घरांमध्ये वीज नाही.
येत्या २ दिवसांत १८-२४ इंच बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अधिका-यांनी सांगितले की, या आठवड्यात झालेला विक्रमी पाऊस आणि डिसेंबर-फेब्रुवारीमध्ये झालेल्या हिमवृष्टीमुळे कॅलिफोर्नियातील दुष्काळाची समस्याही कमी झाली आहे. यूएस नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशनने गुरुवारी ड्रॉट मॅप जारी केला. यानुसार, कॅलिफोर्नियाचा सुमारे १७% भाग कोरडा नव्हता, तर उर्वरित एक तृतीयांश भागही कोरडा घोषित केलेला नाही.