22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Homeआंतरराष्ट्रीयअ‍ॅस्ट्राजेनकाच्या लसीमुळे रक्ताच्या गाठी?

अ‍ॅस्ट्राजेनकाच्या लसीमुळे रक्ताच्या गाठी?

एकमत ऑनलाईन

जिनेव्हा : ऑक्सफर्ड विद्यापीठ-अ‍ॅस्ट्राजेनकाने विकसित केलेल्या कोरोना लसीवर प्रश्न निर्माण होत असताना जागतिक आरोग्य संघटनेने यावर भाष्य केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ही लस प्रभावी असल्याचे सांगतिले असून चिंता करण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले आहे. डेन्मार्क, ऑस्ट्रियामध्ये एस्ट्राजेनकाची लस घेतल्यानंतर काहीजणांच्या शरीरात रक्ताच्या गाठी तयार झाल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने हे वक्तव्य केले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्ते मार्ग्रेट हॅरीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, एस्ट्राजेनकाच्या लसीचा वापर थांबवण्याची आवश्यकता नाही. या लशीचे डोस सुरू ठेवायला हवेत असे त्यांनी म्हटले. जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्लागार समितीच्यावतीने लसीच्या सुरक्षा डेटाचा अभ्यास करण्यात येत आहे. आतापर्यंत लस आणि रक्ताची गाठ तयार होण्यात आम्हाला कोणताही संबंध आहे, असे आढळले नाही. एस्ट्राजेनका ही अन्य लसीप्रमाणेच चांगली लस असल्याचे सांगत लशीमुळे मृत्यू झाले असल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला.

मार्ग्रेट यांनी सांगितले की, लस घेतल्यानंतर झालेल्या मृत्यूंचे विश्लेषण करण्यात आले आहे. त्या व्यक्तींच्या मृत्यूत कोरोनाची लस जबाबदार असल्याची बाब कुठेही समोर आली नाही. त्यामुळे एस्ट्राजेनकाच्या लशीचा वापर सुरूच ठेवायला हवा असेही त्यांनी सांगितले. एस्ट्राजेनकाच्या लसीमुळे सुरक्षितेबाबत इतर काही शंका, चिंता असल्यास त्याची निश्चितपणे तपासणी करायला हवी असेही त्यांनी स्पष्ट केले.

लसीवर दोन आठवड्यांची बंदी
ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राजेनकाच्या कोरोना लसीमुळे रक्ताच्या गाठी तयार होत असल्याचे समोर आले. त्यानंतर डेन्मार्क या लशीच्या वापरावर दोन आठवडे बंदी घातली आहे. अ‍ॅस्ट्राजेनकाची लस घेतल्यानंतर काहीजणांच्या शरीरात रक्ताची गाठ तयार झाल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे.

लस वापरल्यानंतर गंभीर दुष्परिणाम
युरोपीयन देशांमध्ये अ‍ॅस्ट्राजेनकाची लस वापरल्यानंतर गंभीर दुष्परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. डेन्मार्कचे आरोग्य मंत्री मॅनगस ुनिक यांनी सांगितले की, अ‍ॅस्ट्राजेनकाच्या लसीमुळे रक्ताच्या गाठी तयार होत आहेत, असे सध्या तरी म्हणता येणार नाही. लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी का तयार झाल्या, याचे विश्लेषण सुरू आहे. सध्या तरी लस वापरावर १४ दिवसांची स्थगिती आणली असल्याचे त्यांनी सांगितले.

१६९ दिवसांनंतर शेतक-यांचे रेल्वे रोको आंदोलन संपुष्टात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या