27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeआंतरराष्ट्रीयब्रिटन युक्रेनला विध्वंसक शस्त्र देणार

ब्रिटन युक्रेनला विध्वंसक शस्त्र देणार

एकमत ऑनलाईन

लंडन : रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांनी अमेरिका आणि पाश्चात्त्य देशांना धमकी दिली आहे. धमकीच्या एका दिवसानंतर ब्रिटनने जाहीर केले की, तो युक्रेनला रशियाचे हल्ले रोखण्यास मदत करण्यासाठी प्रगत संरक्षण सामुग्री देण्यास अमेरिकेबरोबर सहभागी होईल. ब्रिटनचे संरक्षणमंत्री बेन वालेस म्हणाले, जशी रशियाची रणनीती बदलते त्या प्रमाणेच युक्रेनला आम्ही मदत करू. युक्रेनियन सैनिकांना नवीन लाँचर्स वापरण्याचे प्रशिक्षण दिले जाईल असे वालेस यांनी सांगितले.

वास्तविक ब्रिटनने युक्रेनला अत्याधुनिक एम २७० रॉकेट लाँचर देण्याचे जाहीर केले आहे. या रॉकेट लाँचरची मारक क्षमता ८० किलोमीटर असल्याचे सांगितले जाते. ब्रिटनने रशियावर सुरू केलेल्या हल्ल्यांपासून ब्रिटनने युक्रेनला मदत केली आहे. युक्रेनला अँटी एअरक्राफ्ट मिसाईल्स त्या देशाने पाठविले होते. युक्रेनला ब्रिटनचा पाठिंबा नेहमीच राहिल असे वालेस यांनी सांगितले.
सध्या ब्रिटिश लष्कर युक्रेनियन सैनिकांना रणगाडे चालविण्याचे प्रशिक्षण देत आहे. यापूर्वी अमेरिकेनेही युक्रेनला हार्पून अँटीशीप मिसाईल आणि एम १४२ हाय मोबिलिटी आर्टीलरी रॉकेट सिस्टिम देण्याचे जाहीर केले होते. अमेरिकेने युक्रेनला ७०० मिलियन डॉलरची सुरक्षा साहाय्यता देण्याच्या योजनेचीही घोषणा केली होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या