24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeआंतरराष्ट्रीयब्रिटिश प्रसारमाध्यमांना रशियात प्रवेशबंदी

ब्रिटिश प्रसारमाध्यमांना रशियात प्रवेशबंदी

एकमत ऑनलाईन

मॉस्को : रशियाने ब्रिटनमधील अनेक माध्यमांना आणि संरक्षण क्षेत्राशी निगडित अनेक व्यक्तींना रशियात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. युक्रेन युद्धात रशियाबाबत चुकीचे वृत्त प्रसारित केल्याचा ठपका या सर्वांवर ठेवण्यात आला आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने आज ही घोषणा केली.

त्यानुसार, ब्रिटिश माध्यमांमधील २९ पत्रकार आणि निवेदकांनी युक्रेनमधील रशियाच्या कारवाईचे चुकीचे चित्रण जगासमोर मांडल्याने त्यांना रशियात प्रवेश करण्यास मनाई केली जात असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या