31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeआंतरराष्ट्रीयअमेझॉनला दणका ; १.३८ लाख कोटींचा दंड होण्याची शक्यता

अमेझॉनला दणका ; १.३८ लाख कोटींचा दंड होण्याची शक्यता

विक्रेत्यांच्या माहितीचा गैरउपयोग केल्याचा आरोप ; युरापियन युनियनमध्ये तक्रार

एकमत ऑनलाईन

ब्रुसेल्स : जागतिक पातळीवरील दिग्गज कंपनी अमेझॉनला १.३८ लाख कोटी रुपयांचा दंड होण्याची शक्यता आहे. अमेझॉन कंपनीविरोधात युरोपियन युनियनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. अमेझॉनवर आपल्या विक्रेत्यांच्या माहितीची गैरउपयोग केल्याचा गंभीर आरोप आहे.

अमेझॉनने आपल्या वस्तूंची विक्री वाढवण्यासाठी विक्रेत्यांच्या माहितीचा दुरुपयोग केल्याचा आरोप विक्रेत्यांनी केला आहे. या प्रकरणात युरोपीय युनियनच्या नियमांचं उल्लंघन झाले असून अमेझॉनविरोधात व्यापारात गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दोषी सापडल्यास अमेझॉनला मोठा भूर्दंड बसणार आहे. दंडापोटी आपल्या एकूण वार्षिक टर्नओव्हरच्या १० टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागू शकते. हा आकडा जवळपास १.३८ लाख कोटी रुपयांपर्यंत जातो.

स्वत:च्या लेबलच्या वस्तुंची गैरपद्धतीने विक्री
युरोपियन युनियनने चुकीच्या पद्धतीने व्यापार केल्याच्या आरोपाखाली तक्रार नोंदवली आहे. अमेझॉनवर आपल्या प्लॅटफॉर्मवर आपले लेबल असलेल्या स्वत:च्या वस्तूंची विक्री वाढवण्यासाठी विक्रेत्यांच्या माहितीचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे. नियमांनुसार ई कॉमर्स प्लेटफॉर्म थर्ड पार्टी सेलर्सच्या व्यवहारांची माहिती आपल्या फायद्यासाठी वापरु शकत नाही, असे करणे बेकायदेशीर मानले जाते. दुसरीकडे आपल्यावरील आरोप अमेझॉनने फेटाळत विनाधार असल्याचे म्हटले आहे.

बिहारमध्ये भाजप मजबूत करणे हेच ध्येय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या