वॉशिंग्टन : अमेरिकेच्या २९ राज्यांत भीषण थंडीचा कहर वाढला आहे. हिमवादळामुळे रस्ते ब्लॉक झाले आहेत. दुसरीकडे, १० लाखांहून जास्त घरे आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांना फटका बसला आहे. कॅलिफोर्नियात हिमवादळानंतर पुराचा धोका वाढला आहे. हवामान विभागाने पूर्वानुमान जारी केला,
त्यानुसार शनिवारी लॉस एंजलिसकडे काही डोंगरांवर ५ फुटांपर्यंत बर्फवृष्टी होऊ शकते. यामुळे ताशी १२० किमी वेगाने चालणारे वादळ आणि बर्फवृष्टी होण्याचा धोका कायम आहे. मोठया बर्फवृष्टीदरम्यान हवामान विभागाने सांगितले की लोकांना पुराचा सामना करावा लागू शकतो. यासाठी इशाराही जारी केला आहे. सिएरा नेवादा क्षेत्रात ३ ते ५ फुटांपर्यंत बर्फवृष्टीची भविष्यवाणी आहे.