25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeआंतरराष्ट्रीयकॅनडाकडून एका व्यक्तीमागे तब्बल नऊ डोसची खरेदी!

कॅनडाकडून एका व्यक्तीमागे तब्बल नऊ डोसची खरेदी!

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत ११ कोटी, ११ लाख,७९ हजार,५७८ जणांचे लसीकरणही पूर्ण झाले आहेत. मात्र प्रतिव्यक्तीमागे भारतात एकही लसीचा डोस खरेदी झालेला नाही. दुसरीकडे कॅनडासारख्या देशानेही प्रतिव्यक्ती ८.७ डोस खरेदी केले आहेत.

भारतात एकूण १.११ अब्ज व्हॅक्सीन डोस खरेदी करणारा आहे. परंतु, यामध्ये २०.५५ कोटी डोसची खरेदी झाली आहे. तर आता ९०.४५ कोटी डोस खरेदी करण्याची शक्­यता आहे. भारताच्या लोकसंख्येचा विचार करता हे प्रमाण एक इतकेही नाही. दुसरीकडे अमेरिका भारताकडून २.५१ अब्ज व्हॅक्सीन डोस खरेदी करणार आहे. अमेरिकेने १.२१ अब्ज डोस खरेदी केले आहेत. तर आणखी १.३० कोटी डोस खरेदी करण्याच्या प्रयत्नात आहे.

१४ एप्रिलपर्यंत उपलब्ध व्हॅक्सीननुसार भारताकडे आता केवळ २०.५५ डोस उपलब्ध आहेत. हे आकडे पाहिले तर भारत आपल्या लोकसंख्येनुसार प्रती व्यक्ती केवळ ०.२ व्हॅक्सीन डोस खरेदी करू शकला आहे. तर कॅनडा आपल्या प्रत्येक नागरिकासाठी ८.७ डोसच्या दराने व्हॅक्सीनचा साठा केला आहे.

टॉप १० देशांमध्ये भारत नाही
जगातील टॉप १० देश पहिले तर प्रती व्यक्ती ७.३ डोससोबत यूके दुसऱ्या, न्युझीलँड (६.६ डोस) तिसरÞ्या, चीली (५ डोस) चौथ्या, ऑस्ट्रेलिया (४.९ डोस) पाचवा, युरोपियन युनियन (४.६ डोस) सहावा, अमेरिका (४ डोस) सातवा, इजरायल (३.१) आठवा, स्वित्झर्लंड (२.८ डोस) नवव्या, दक्षिण कोरिया (२.६ डोस) १० व्या क्रमांकावर आहे. म्हणजेच, भारताचा टॉप-१० देशांमध्ये कोठेचं स्थान नाही.

गुजरातमधील कोरोनाबाधितांची खरी आकडेवारी द्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या