ओटावा : नवीन वर्ष जसे सुरु झाले तसे कोरोना महामारीच्या अंताला सुरुवात करणा-या अनेक बातम्या येऊ लागल्या आहेत. जगभरात कोरोनावरील लसीकरण सुरु झाले आहे. अशातच आता कोरोनाग्रस्त रुग्णाला वाचविण्यासाठी काही औषधांच्या निर्मितीच्याही आशा निर्माण झाल्या आहेत. कॅनडातील संशोधकांनीही कोरोनामुक्तीसाठी गांजाचा वापर उपयुक्त ठरु शकतो, असे संशोधन केले आहे.
जगभरातील १०० हून अधिक संस्थांमध्ये कोरोनावरील रामबाण औषधनिर्मितीसाठी प्रयत्न सुरु आहेत. अशातच कॅनडामधील एका विद्यापीठाने गांजाचा वापर करुन कोरोनाचा सर्वाधिक धोका असणा-या वयोगटातील आणि गंभीर आजार असणा-यांना वाचवता येऊ शकते असा दावा केला आहे. संशोधनानुसार शरीरामधील रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी गांजा उपयुक्त ठरतो. कोरोना तसेच इतर गंभीर आजार असणा-या व्यक्तींवर गांजाचा अंश असणा-या औषधांचा वापर करण्यास सुरुवात करता येईल असेही संशोधनात म्हटले आहे.
साइटोकाईन स्टार्ममुळे मृत्यूची शक्यता
वृत्तानुसार कॅनडामधील लेथब्रिज विद्यापीठामधील संशोधकांच्या एका गटाने रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने शरीरामध्ये साइटोकाइन स्टार्म नावाची प्रक्रिया सुरु होते, यामुळे शरीरामधील निरोगी पेशींवरही परिणाम होतो. कोरोनाबाधित तसेच इतर आजारग्रस्त अनेक रुग्णांचा याच कारणामुळे मृत्यू झाला आहे, असा दावा केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासूनच जगभरातील संशोधक साइटोकाइन स्टार्मचा प्रभाव कमी करण्यासाठी उपाय शोधत आहेत. विषाणू शरीरामधून नष्ट केल्यानंतरही ही प्रक्रिया सुरुच असते. यामुळे अक्यूट रेस्पिरेट्री डिस्ट्रेस सिंड्रोम म्हणजेच एआरडीएसचा त्रास होऊ शकतो. या एआरडीएसमुळेच कोरोनाग्रस्ताचा मृत्य होतो. तसेच लंग फ्रायब्रेसिसचा त्रासही होऊ शकतो. लंग फ्रायब्रेसिसमध्ये फुफ्फुसांच्या पेशी खराब होऊन फुफ्फुसे निकामी होतात.
गांजाच्या पानांमधील तत्व उपयुक्त
गांजाच्या पानांमध्ये आढळणारे तत्व या साइटोकाइन स्टार्मला थांबवू शकते. साइटोकाइन स्टार्म निर्माण होण्यासाठी इंटरलुकीन-६ आणि ट्युमर नेसरोसीस फॅक्टर अल्फा ही दोन रसायने कारणीभूत असतात. याच रसायनांचे प्रमाण गांजामधील तत्वाच्या मदतीने कमी करता येते,असे या संशोधकांनी म्हटले आहे.
गांजाचे ३ स्ट्रेन सायटोकाईन स्टार्मवर प्रभावी
लेथब्रिज विद्यापीठामधील संशोधकांनी गांजामधील २०० वेगवेगळया स्ट्रेन्सचा अभ्यास केला. त्यापैकी सात स्ट्रेनवर त्यांनी सविस्तर संशोधन केले. हे संशोधन रिसर्च स्केयर मध्ये प्री-प्रिंट केले आहे. ७ पैकी ३ स्ट्रेन असे आहेत जे साइटोकाइन स्टार्मवर परिणामकारक ठरतील असे त्यांनी सांगितले आहे. या स्ट्रेनला नंबर फोर, नंबर एट आणि नंबर फोर्टीन अशी नाव दिली आहेत. आता या स्ट्रेनचा वापर कोरोनाचा संसर्ग झाल्याने प्रकृती चिंताजनक असणा-या आयसीयूमधील रुग्णांवर करण्याचा विचार केला जात आहे.
मोदी मला गोळ्या घालू शकतात; मी मोदींना घाबरत नाही