मुंबई : अरबी समुद्रात बुडणा-या व्यापारी जहाजातील २२ जणांचा जीव वाचवण्यात तटरक्षक दलाला यश आले. भारतीय तटरक्षक दलाने समुद्रात बुडणा-या एमटी ग्लोबल किंग आय या व्यापारी जहाजातून सर्व २२ क्रू मेंबर्सची सुटका केलीे. आयसीजी जहाजे आणि एएलएच ध्रुव पोरबंदर येथून रवाना करण्यात आले होते, ज्यांच्या मदतीने समुद्रात ९३ नॉटिकल मैल अंतरावर बचाव कार्य करण्यात आले, अशी माहिती आयसीजीने दिली. सुटका करण्यात आलेल्यांमध्ये २० भारतीयांसह १ पाकिस्तानी आणि १ श्रीलंकेचा नागरिक आहे.