31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeआंतरराष्ट्रीयसावधान - फ्रीजमधील पदार्थांच्या पॅकिंगवर आढळले कोरोनाचे विषाणू

सावधान – फ्रीजमधील पदार्थांच्या पॅकिंगवर आढळले कोरोनाचे विषाणू

एकमत ऑनलाईन

बीजिंग : सध्या जगभरात कोरोनाच्या संसर्गाने दहशत माजवली आहे. विविध वस्तुंंसह त्वचेवर कोरोनाचा विषाणू किती दिवस सक्रिय राहतो, याचे संधोधकांकडून दावे केले जात आहेत. अद्यापही प्रभावी लशीची निर्मिती होत नसल्याने प्रतिबंध हाच उपाय अशी स्थिती आहे. अशातच चीनच्या रोग नियंत्रण व प्रतिबंधक केंद्राने केलेल्या नव्या दाव्याने चिंतेत भर पडली आहे. चीनमध्ये फ्रीजमध्ये थंड केलेल्या पदार्थांच्या आवरणावर कोरोनाचे जिवंत विषाणू आढळून आले आहेत,तसेच त्यामुळे अनेक नवीन रोगी आएळल्याचे सांगण्यात येत आहे.

चीनमधील रोग नियंत्रण व प्रतिबंधक केंद्राने हे निरीक्षण नोंदवले आहे. फ्रीजमध्ये थंड करण्यात आलेल्या पदार्थांच्या आवरणावर कोरोनाचे जिवंत विषाणू असल्याचा दावा केंद्राने केला आहे. चीनमधील किनारपट्टी भागात असलेल्या किंगदाओ शहरात हे आढळून आले आहे. फ्रिजमध्ये थंड केलेल्या पदार्थांच्या आवरणावर आढळलेल्या कोरोना विषाणुंमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका चीनच्या रोग नियंत्रण व प्रतिबंधक केंद्राने व्य्क्त केला आहे. किंगदाओ शहरात या महिन्यात अनेक कोरोना रुग्ण आढळून आले. यात परदेशातून आलेल्या आणि उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेले रुग्ण अधिक आहेत, असे सांगण्यात येत आहे.

आयात शीतपदार्थ धोकादायक
परदेशातून शीतपदार्थ आयात करण्यामुळे कोरोना वाढीचा धोका अधिक असल्याचे चीनकडून सातत्याने सांगितले जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून चीनकडून याचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. यापूर्वी काही देशांमध्ये अशा पदार्थांच्या आवरणांची तपासणी करण्यात आली होती. ज्यात कोरोना विषाणू असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर इंडोनेशियातील सीफूड आणि ब्राझीलमधील उत्पादनांवर चीनने बंदी घातली होती.

जागतिक आरोग्य संघटनेने फेटाळला दावा
चीनने जरी हा दावा केला असला तरी जागतिक आरोग्य संघटनने मात्र ही बाब फेटाळून लावलेली आहे. अन्न पदार्थांच्या आवरणाच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होत असल्याचा कोणताही पुरावा सापडला नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

खडसेंबद्दलच्या प्रश्नावर अजित पवारांनी जोडले हात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या