26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeआंतरराष्ट्रीयसावधान-नवा विषाणू अधिक घातक

सावधान-नवा विषाणू अधिक घातक

‘डब्ल्युएचओ’चा इशारा;युरोपीय देशांना कडक लॉकडाऊनचा सल्ला

एकमत ऑनलाईन

लंडन: कोरोनाचा नवा विषाणू आधीच्या विषाणूपेक्षा घातक आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. त्यामुळे युरोपिय देशांनी कडक निर्बंधांसह लॉकडाऊन करावे, असे आवाहन संघटनेने केले आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार नवा विषाणू प्रथम सप्टेंबर महिन्यात आढळून आला. त्यानंतर लगेच त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात सुरु झाला. सध्या या विषाणूने मोठे रुप धारण करण्यास सुरुवात केली आहे.

लसीच्या प्रभावावरही परिणामाची भीती
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार कोरोनाचा नवा विषाणू हा सध्याच्या विषाणूपेक्षा तब्बल ४० ते ७० टक्­क्­यांनी अधिक वेगवान प्रसार करु शकतो. वेगाने फैलाव होण्याच्या त्याच्या प्रवृत्तीमुळे कंपन्यांकडून विकसित करण्यात आलेल्या कोरोना लसींचा प्रभाव कमी होण्याचा धोका आहे. लसींच्याही नव्याने संशोधनाची गरज निर्माण झाली आहे.

खुनांच्या गुन्ह्यात नागपूर देशात दुसरे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या