22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeआंतरराष्ट्रीयबायडन यांच्या विजयामुळे पाकिस्तानमध्ये आनंदोत्सव

बायडन यांच्या विजयामुळे पाकिस्तानमध्ये आनंदोत्सव

एकमत ऑनलाईन

इस्लामाबाद : अमेरिकेच्या अध्यक्षपदी ज्यो बायडन यांच्या निवडीनंतर पाकिस्तानमध्येही आनंदाचे वातावरण आहे. अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा आंतरराष्ट्रीय मंचावर पाकिस्तानवर जोरदार टीका केली होती. ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिका आणि पाकिस्तानचे संबंधही चांगले राहिले नाहीत. त्यामुळेच ट्रम्प यांच्या पराभवानंतर पाकिस्तानला बायडन यांच्या काळात पुन्हा पाकिस्तानला आर्थिक मदत मिळेल अशी आशा वाटत आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बायडन यांचा शुभेच्छा देताना कराच्या रक्कमेमध्ये होणारी चोरी आणि इतर अनेक मुद्द्यांवर अमेरिकेसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची कन्या मरीयम नवाज यांनीही बायडन यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

बायडन हे आधीपासूनच पाकिस्तान समर्थक नेते आहेत. बायडन यांना २००८ मध्येच पाकिस्तानमधील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘हिलाल-ए-पाकिस्­तान’ प्रदान करण्यात आला आहे. पाकिस्तानला अमेरिकेने आर्थिक मदत करायला हवी असे मत असणा-या मोजक्या अमेरिकन नेत्यांमध्ये बायडेन यांचा समावेश होतो.

‘बायडन यांच्याद्वारे अनुच्छेद ३७० पुन्हा लागू होणार’,

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या