22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeआंतरराष्ट्रीयचार्ल्स यांनी ब्रिटनचा महाराजा म्हणून स्वीकारला पदभार

चार्ल्स यांनी ब्रिटनचा महाराजा म्हणून स्वीकारला पदभार

एकमत ऑनलाईन

लंडन : ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र चार्ल्स यांची महाराजा म्हणून निवड करण्यात आली. महाराज चार्ल्स तिसरे यांनी शनिवार दि. १० सप्टेंबर रोजी अधिकृतपणे पदभार स्वीकारला आहे. सेंट जेम्स पॅलेसमधील बैठकीत चार्ल्स यांना अधिकृतपणे ब्रिटनचे राजे म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

सेंट जेम्स पॅलेस येथे सोहळ्यात त्यांनी महाराज पदाची शपथ घेतली. महाराणी एलिझाबेथ या ब्रिटनच्या सम्राज्ञी म्हणून गेली सात दशके कार्यरत होत्या. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर ब्रिटीश राजघराण्याच्या नियमांप्रमाणे प्रिन्स चार्ल्स यांची महाराजपदी निवड करण्यात आली आहे. चार्ल्स यांना महाराज म्हणून जाहीर केले असले तरी त्यांचा राज्याभिषेक सोहळा काही दिवसांनी आयोजित करण्यात येईल. आज होणारा कार्यक्रम हा पदग्रहण सोहळा असणार आहे. राज्याभिषेक सोहळ्यासाठी विशेष तयारी केली जाते. या सोहळ्याचे विशेष नियोजन केले जाते. या पदग्रहण सोहळ्यासाठी ब्रिटनच्या सर्व माजी पंतप्रधान, ज्येष्ठ खासदार, इतर अधिका-यांची उपस्थिती होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या