नवी दिल्ली : ६३ वर्षीय न्यायमूर्ती काझी फैज इसा पाकिस्तानचे २९ वे सरन्यायाधीश बनले आहेत. राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी रविवारी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
यावेळी काळजीवाहू सरकारचे पंतप्रधान अन्वर उल हक काकर आणि लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर हेही उपस्थित होते. सरन्यायाधीश इसा १३ महिने या पदावर राहतील. माजी सरन्यायाधीश ओमर अता बंदियाल यांनी कधीही काझींना प्राधान्य दिले नाही. त्यांना कोणत्याही खंडपीठाचा भाग बनवले गेले नाही.