27.8 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeआंतरराष्ट्रीयखशोगींच्या मारेक-यांना मुलांकडून माफी

खशोगींच्या मारेक-यांना मुलांकडून माफी

एकमत ऑनलाईन

दुबई: वृत्तसंस्था
पत्रकार जमाल खशोगी यांच्या मारेक-यांना त्यांच्या मुलांनी माफ केले आहे. या पाचही आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली होती. आता त्यांना कायदेशीररित्या माफी मिळणार आहे.

मूळचे सौदी अरेबियाचे नागरिक असणारे खशोगी अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्ट या दैनिकात स्तंभ लिहित होते आणि त्यांनी सौदी अरेबियाचे राजकुमार महंमद बिन सलमान यांच्यावर सातत्याने टीका केली होती. यातूनच २०१७मध्ये तुर्कीतील इस्तंबूलच्या वकिलातीमध्ये खशोगी यांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या मृतदेहाचीही वकिलातीमध्येच विल्हेवाट लावण्यात आली होती. महंमद बिन सलमान यांच्या सांगण्यावरूनच ही हत्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत होता आणि त्यांच्यावरही आरोप ठेवण्यात यावेत, यासाठी सातत्याने दबाव आणला जात होता. अखेरीस महंमद बिन सलमान यांच्या निकटवर्तीय दोन अधिकाºयांसह पाच जणांना अटक करण्यात आली होती.

Read More  चीन, रशियापासून धोका, ट्रम्प करणार अणूचाचणी !

या खटल्यात डिसेंबरमध्ये न्यायालयाने निकाल देत, पाचही जणांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. खशोगी यांचा मुलगा सला सौदी अरेबियामध्येच राहतो. त्यांनी इस्लामिक परंपरांनुसार रमजान महिन्यामध्ये या आरोपींना माफी दिली आहे. सलाह यांनीच ट्विटरवरून या निर्णयाची माहिती दिली. सलाह यांना सौदी राजघराण्याकडून आर्थिक भरपाईही देण्यात आली आहे. या आरोपींची मृत्युदंडाची शिक्षा रद्द होणार असली, तरीही त्यांची शिक्षा पूर्ण माफ झाली, असा त्याचा अर्थ नाही, असे अधिका-यांकडून सांगण्यात आले. या हत्येनंतर अमेरिकेने सौदी अरेबियावर कारवाई करावी, यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील दबाव वाढला होता. मात्र, ट्रम्प यांनी सौदी अरेबियाबरोबरील संबंध कायम ठेवले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या