25.4 C
Latur
Monday, March 1, 2021
Home आंतरराष्ट्रीय कोरोनाच्या प्रसाराला चीन व डब्ल्यूएचओे जबाबदार

कोरोनाच्या प्रसाराला चीन व डब्ल्यूएचओे जबाबदार

आयपीपीआरच्या अहवालात ठपका; वेळीच पावले उचलली नाहीत

एकमत ऑनलाईन

जिनिव्हा: गेल्यावर्षी कोरोनाचा संसर्ग वेगाने जगभरात फैलावला. मात्र हा संसर्ग रोखणे शक्य होते, असे इंडिपेंडेंट पॅनल फॉर पॅन्डामिक प्रिपेयर्डनेस अ‍ॅण्ड रिस्पॉन्सने (आयपीपीआर)आपल्या अहवालात नमूद केले. कोरोनाच्या संसर्गाला लपवल्यामुळेच जगभरात हा विषाणू फैलावला असल्याचे गंभीर आरोप या अहवालात केला आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या काही प्रकरणांचा अभ्यास केल्यानंतर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी याआधीच पावले उचलता येणे शक्य होते, असेही या अहवालात म्हटले आहे.

अहवालानुसार, चीनचे स्थानिक आणि राष्ट्रीय आरोग्य प्रशासनाला जानेवारी महिन्यातच जलदपणे आणि गंभीरपणे पावले उचलता येणे शक्य होते.मात्र ते केले नाही. महासाथीच्या सुरुवातीला जागतिक आरोग्य संघटनेने दाखवलेल्या हलगर्जीपणालाही पॅनेलने जबाबदार ठरवले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने २२ जानेवारीपर्यंत आपात्कालीन बैठकही घेतली नाही. त्यावेळीदेखील आरोग्य संघटनेच्या समितीने कोरोनाला आपात्कालीन परिस्थिती घोषित करण्यासाठी एक आठवड्याचा अवधी घेतला. या उशिराचे कारण अद्यापही स्पष्ट नसल्याचे अहवालात नमूद केले आहे.

अमेरिकेकडूनही पुर्वीपासूनच चीन व डब्ल्यु एचओ लक्ष्य
या आधीदेखील अमेरिकेच्या गृहविभागाने एक अहवाल प्रकाशित करून वुहान येथील वायरॉलजी इन्स्टिट्यूटवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. तसेच सखोल चौकशीची मागणीही केली होती. चीन सरकारने कोरोनाबाबतची अनेक माहिती लपवली असून असत्य सांगण्यासाठी आपली ताकद झोकून दिली असल्याचे या अहवालात म्हटले होते.

भारताकडून लस मिळविण्याचा पाकचा प्रयत्न

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या