33.7 C
Latur
Monday, March 1, 2021
Home आंतरराष्ट्रीय ट्रम्प प्रशासनातील २८ जणांना चीनकडून प्रवेशबंदी

ट्रम्प प्रशासनातील २८ जणांना चीनकडून प्रवेशबंदी

एकमत ऑनलाईन

बीजिंग : डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षपदावरून पायउतार होताच चीनने ट्रम्प यांच्या टीममधील २८ जणांना मोठा झटका दिला. चीनने २८ जणांसाठी चीनने द्वार बंद केले असून, त्यांच्यावर चीनसह हॉगकाँग आणि मकाऊमध्येही बंदी घालण्यात आली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने याविषयी बुधवारी निवेदन प्रसिद्ध केले आहे. मागील काही वर्षांपासून अमेरिकेत काही चीनविरोधी स्वार्थी नेत्यांनी आपल्या राजकीय हेतू पूर्ण करण्यासाठी चीनविरोधात पूर्वग्रह दूषितपणातून अमेरिका आणि चीनमधील नागरिकांच्या हिताकडे दुर्लक्ष केले. चीन सरकार देशाच्या सार्वभौमत्व, सुरक्षा आणि हितांचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे, असे सांगत चीनने ट्रम्प यांच्या टीममधील २८ जणांवर बंदी घातली आहे.

चीनने अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माईक पॅम्पिओ, माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉर्बट ब्रायन आणि जॉन बॉल्टन, माजी आरोग्य सचिव अ‍ॅलेक्स अझर, अमेरिकेचे माजी उच्चायुक्त केली क्राफ्ट, ट्रम्प यांच्या वर्तुळातील स्टीव्ह बॅनॉन यांच्यासह २८ जणांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे २८ जणांना चीनसह हॉगकाँग आणि मकाऊमध्ये प्रवेश करता येणार नाही. महत्त्वाचं म्हणजे नेते आणि अधिका-यांसह त्यांच्या कुटुंबियांनाही चीनने दरवाजे बंद केले आहेत. बंदी घातलेल्या या २८ जणांना चीनसोबत व्यापार करण्यावरही बंदी घातली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात हे स्पष्ट करण्यात आले आहे.

खासगी बँकांना शासकीय व्यवहार हाताळण्याची परवानगी – केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा निर्णय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या