34.3 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeआंतरराष्ट्रीयचीनने केली महाकाय पाणबुडीची निर्मिती

चीनने केली महाकाय पाणबुडीची निर्मिती

एकमत ऑनलाईन

बीजिंग : अमेरिका आणि भारतासोबत सरू असलेल्या तणावादरम्यान चीनने रशियाच्या टायफून वर्गातील आतापर्यंतच्या सर्वार्थाने महाकाय म्हणून ओळखल्या जार्णा­या पाणबुडीपेक्षाही मोठ्या पाणबुडीची निर्मिती केली आहे. टाईप-१०० वर्गातील ही पाणबुडी ४८ एसएलबीएम या अण्वस्त्रवाहूू क्षेपणास्त्रांनी सज्ज असणार असून, क्षणार्धात कोणत्याही छोट्या-मोठ्या देशाला जगाच्या नकाशावरून गायब करण्यासाठी सक्षम असल्याचा दावा करण्यात आला आहे.

या पाणबुडीचा आकार आणि वैशिष्ट्ये पाहता तज्ज्ञांनी टाईप-१०० ला पाणबुड्यांचा देवाची उपमा दिली आहे. ही पाणबुडी इतकी घातक आहे की, ती अण्वस्त्रांनी सज्ज टॉर्पेडोही डागू शकते. या पाणबुडीवर एक हँगर असून त्यात तुलनेने छोट्या पाणबुडीला फिट करता येते. ही छोटी पाणबुडी उथल पाण्यात शत्रूच्या हद्दीत जाऊन गोपनीय माहिती संकलित करण्याचे काम करु शकते.

रशियाच्या टायफूनची सद्दी संपली
रशियाची टायफून वर्गातील अजस्र पाणबुडीचा आतापर्यंत सागरी क्षेत्रात दबदबा राहिला आहे. मात्र चीनची नवी पाणबुडी रशियाच्या टायफूनपेक्षा सरस असल्याचे मानले जात आहे. तिथेच अमेरिकेच्या ओहिओ वर्गातील बलाढ्य पाणबुडीपेक्षा टाईप-१०० तीन-चार पट मोठी आहे. ही पाणबुडी चीनमधील हुलुडाओतील बोहाई शिपयार्डमध्ये तयार करण्यात आली असून, तिला सन त्जु क्­लास पाणबुडी म्हणूनही ओळखले जाईल.

१५-२० दिवसांत आणखी उद्रेक !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या