22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeआंतरराष्ट्रीयखोल समुद्रातूनही क्षेपणास्त्र हल्ला करू शकतो चीन!

खोल समुद्रातूनही क्षेपणास्त्र हल्ला करू शकतो चीन!

एकमत ऑनलाईन

भारत आणि अमेरिकेला धोका
वॉशिंग्टन : चीन गुप्तपणे लांब आणि कमी पल्ल्याच्या पारंपारिक क्षेपणास्त्रांचा साठा वाढवण्यात गुंतला आहे. अमेरिकन तज्ञांच्या अहवालानुसार, चिनी पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) आता जमिनीवरून आणि समुद्रातून डागता येणा-या कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज झाला आहे.

हिंदी महासागरातील अमेरिकेच्या लष्करी उपस्थितीला यामुळे गंभीर धोका निर्माण झाला आहे. चीनने आपली रॉकेट आर्मी आधीच तयार केली आहे. या अहवालानुसार, पूर्व लडाखमध्ये सुरू असलेल्या चीनच्या नव्या लष्करी तयारीमुळे भारताला धोकाही वाढला आहे.

२००० इंडो-पॅसिफिकमध्ये तैनात
अमेरिकेच्या संरक्षण विभागाने जारी केलेल्या अहवालानुसार, चीनने इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी सुमारे २००० क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. अशा चार क्रूझ क्षेपणास्त्रांची कमाल श्रेणी १८०० किमी पर्यंत आहे. अमेरिकन तज्ञांचे म्हणणे आहे की, या कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी लक्ष््यावर जास्त अचूक मारा केला जातो. चीनकडे सध्या सर्वात शक्तिशाली क्रूझ क्षेपणास्त्रे आहेत.

या अहवालात म्हटले आहे की, चीनने पारंपारिक आणि आण्विक क्षेपणास्त्रांच्या मोहीमांसाठी नवीन क्षेपणास्त्र ऑपरेशन सिस्टम तयार केली आहे. अशा नव्या व्यवस्थेचा आजवर विचारही कोणी केला नव्हता.

१५००० किमी पर्यंत करू शकतात मारा
यूएस ‘सीएसआयएस’ क्षेपणास्त्र संरक्षण प्रकल्पानुसार, चीनकडे सर्वात सक्रिय आणि नवीन क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम आहे. त्यात ७,००० ते १५,००० किमीच्या पल्ल्याची आंतरखंडीय क्षेपणास्त्रेही आहेत. हे स्पष्ट आहे की, आता अमेरिकन मुख्य भूभाग देखील त्यांच्या लक्ष््याखाली आहे. ते आपल्या आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचे आधुनिकीकरण करण्यात गुंतले आहेत.

वाहनातून प्रक्षेपित केलेल्या क्षेपणास्त्रांबरोबरच ते हायपरसॉनिक आणि बूस्ट ग्लाइड व्हीकल्स बनवण्यातही गुंतलेले आहेत. चिनी नौदल आपल्या पाणबुडींच्या ताफ्यात आण्विक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे तैनात करीत आहे. त्यामुळे समुद्राखालून बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागता येतील.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या