21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeआंतरराष्ट्रीयहायपरसॉनिक जेट इंजिन बनविल्याचा चीनचा दावा

हायपरसॉनिक जेट इंजिन बनविल्याचा चीनचा दावा

एकमत ऑनलाईन

बीजिंग : भारताचा शेजारी असलेल्या चीनने आर्थिक क्षेत्रात केलेली प्रगती नेत्रदीपक आहे. मात्र संरक्षण विशेषत: लढाऊ विमाननिर्मितीच्या क्षेत्रात चीनच्या प्रगतीच्या दाव्यांकडे नेहमीच संशयाने पाहिले जाते. अशातच चीनने केलेल्या आणखी एका दाव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. चीनने एका हायपरसॉनिक जेट इंजिन बनविल्याचा दावा केला असून हे इंजिन ध्वनीच्या १६ पट अधिक वेगाने उड्डाण करु शकते असे म्हटले आहे.

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. माहितीनुसार चीनने या इंजिनला सोड्राम जेट असे नाव दिले असून बीजिंगमधील एका बोगद्यात या इंजिनची चाचणी केल्याचे म्हटले आहे. चाचणीत इंजिनने कमाल वेग मर्यादा गाठल्याचे म्हटले आहे. ध्वनीचा वेग १२३४ किमी प्रतितास एवढा असतो. हे इंजिन त्यापेक्षा १६ पट अधिक वेगाने विमानाला उडवू शकते, असे चीनने म्हटले आहे.

जगातील सर्वात घातक विमान बनणार
चायनिज अ‍ॅकडमी ऑफ सायन्सचे प्राध्यापक जियांग जोंगलिन यांनी या संशोधनाचे नेतृत्व केले होते. नव्या तंत्रज्ञानाचे परीक्षणही तज्ज्ञांनी केले असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. आता हे इंजिन पुढील परीक्षणांमध्ये यशस्वी ठरले आणि लष्कराने त्याचा वापर केला तर हे हत्यार किंवा विमान जगातील सर्वात घातक ठरणार असल्याचा दावा केला आहे. हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले असून तंत्रज्ञान उघड होणार नाही, याची काळजी घेण्यात आल्याचेही साऊथ चायना पोस्टकडून सांगण्यात येत आहे.

पृथ्वीबाहेर विशिष्ठ ऑर्बिटमध्ये फिरणार
तज्ज्ञांच्या मते पारंपरिक विमानांमध्येही हे इंजिन बसविता येणे शक्य आहे. उड्डाण केल्यानंतर हे इंजिन एका खास ऑर्बिटमध्ये पोचेल व लॅडिंग करताना पृथ्वीच्या वातावरणात येईल, असेही सांगण्यात आले आहे.

एस.ई.बी.सी. संवर्गातील पदे वगळून अन्य प्रवर्गातील पदांची भरती !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या