25.5 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeआंतरराष्ट्रीयकोट्यवधी लसीच्या डोससह चीन सज्ज

कोट्यवधी लसीच्या डोससह चीन सज्ज

एकमत ऑनलाईन

बीजिंग : कोरोना लसीचे उत्पादन, निर्यात यांबाबत चीनसह अन्य देशांमध्ये हालचाली सुरू आहेत. सीएनएनच्या रिपोर्टनुसार कोरोना लसीचे कोट्यवधी डोस निर्यात करण्यासाठी चीनने तयारी केली आहे. आता लसीची निर्यात करण्यासाठी चीनला लस रेग्यूलेटरकडून मंजूरी मिळणे गरजेचे आहे. परदेशातील कोरोना लसीची निर्यात करण्यासाठी चीनने आंतरराष्ट्रीय विमानतळावर खास व्यवस्था केली आहे. या ठिकाणी कमी तापमानात लसीचे डोस साठवले जाणार आहेत. रिपोर्ट्सनुसार आता पुढच्या काही महिन्यात चीन अनेक देशांमध्ये आपल्या लसीचे वितरण सुरू करणार आहेत.

चीनच्या ४ कंपन्यांकडून ५ कोरोना लसीच्या चाचण्या सुरू आहेत. एकूण १६ देशांमध्ये चीनी कोरोना लसीचे परिक्षण सुरू आहे. सगळ्यात आधी चीन अशा देशात निर्यात करणार आहे, ज्या देशात लसीची चाचणी सुरू आहे. दरम्यान जगभरातील इतर देशात लसीचे वितरण करण्याचे आवाहन केले आहे. यात अनेक विकसनशील देशांचा समावेश आहे.

चीनी कंपनी सिनोवॅक बायोटेकने ब्राजीलमध्ये ४ कोटी ६० लाख आणि तुर्कीमध्ये ५ कोटी डोस वितरण करण्यासाठी करार केला आहे. कॅनसिनो बायोलॉजिक्सने मॅक्सिकोमध्ये ३ कोटी ५० लाख डोस देण्यासाठी करार केला आहे. सिनोफार्म कंपनीने मागच्या काही महिन्यात दिलेल्या माहितीनुसार १२ देशांनी लस खरेदी करण्याची तयारी दाखवली आहे. २०२१ मध्ये १ अब्ज लसीचे उत्पादन केले जाणार आहे.

लस कधी येणार माहिती नाही

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या