24.7 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeआंतरराष्ट्रीयचिनने कोविडशी संबंधित वस्तूच्या किमती ५ पटीने वाढवल्या

चिनने कोविडशी संबंधित वस्तूच्या किमती ५ पटीने वाढवल्या

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतात कोरोनाच्या दुस-या लाटेने थैमान घातले आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूचे प्रमाण चिंतेचा विषय बनला आहे. अशावेळी चीनने भारताला एक मोठा झटका दिला आहे. चीनी पुरवठादारांनी कोविडशी संबंधित वस्तूंच्या किंमती ५ पटींनी वाढवल्या आहेत. इतकेच नाही तर औषधांचे अनेक कॉन्ट्रॅक्टही रद्द केले आहेत. चिनी पुरवठादारांनी भारतात पुरवठा होणा-या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या किमतीत ५ पटींनी वाढ केली आहे. यापूर्वी मागील वर्षी चीनने व्हेंटिलेटर्सच्या किमती वाढवल्या होत्या. यावेळी मात्र चीनने फक्त किमती वाढवल्या नाहीत तर औषधांच्या पुठवठ्याचे अनेक करार रद्द केले आहेत.

सरकारी उड्डाणांवर चीनकडून बंदी
चिनी वृत्तपत्र साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार चीन सरकारी उड्डाणांवरही बंद घालत आहे. ज्यामुळे भारतातला लागणा-या गरजेच्या वस्तुंचा पुरवठा होणार नाही. हॉन्गकाँगमधील भारताचे काऊन्सिल जनरल प्रियंका चौहान यांनी चीनच्या या कृत्याचा विरोध दर्शवला आहे. पुरवठ्याच्या या साखळीबाबत चीनने असा निर्णय करायला नको होता. चीनच्या या कृत्यामुळे पुरवठ्याची साखळी बाधित होईल आणि कोविडशी संबंधित गरजेच्या वस्तूंच्या किमती गगनाला भिडतील, असे प्रियंका चौहान यांनी म्हटले आहे.

२०० डॉलरच्या वस्तू १ हजार डॉलरवर पोहोचल्या
चीनने हे पाऊल उचलल्यामुळे कोविडशी संबंधित अनेक वस्तूंच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. एखात्या वस्तूची किमत २०० डॉलर किमतीच्या १० लीटर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची किंमत १ हजार डॉलरवर पोहोचली आहे. तर चिनी वृत्तपत्रांच्या म्हणण्यानुसार चीनच्या फार्मा पुरवठादाराने अचानक करार रद्द केले आहेत. आता चीनमधील फार्मा पुरवठादार रेमडेसिवीर आणि फेव्हिपिराविर अशा औषधांचा कच्चा माल लिलावाद्वारे विकत आहेत. तर चीन सरकारने सिच्युआन एअरलाईनच्या भारतातील १० शहरांमधील उड्डाणावर बंदी आणली आहे. त्यामुळे भारताच्या अडचणी अजून वाढणार आहेत.

लातूर येथील सनराईज हॉस्पिटलचे ‘कोविड’ सेंटर रद्द

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या